लखनऊ सुपर जायंट्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी मोठा विजय, मार्क वुडने घेतल्या ५ विकेट्स

पुणे, २ एप्रिल २०२३: केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२३ मधील त्यांच्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा ५० धावांनी पराभव केला. लखनऊच्या विजयाचा नायक असा गोलंदाज होता, जो जवळपास ५ वर्षे आयपीएल पासून दूर राहिला आणि ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल मध्ये परतला. मार्क वुडने तब्बल ५ वर्षांनंतर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये पुनरागमन करून खळबळ उडवून दिली. त्याने १४ धावांत ५ विकेट्स घेतले.

पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सरफराज खान, अक्षर पटेल आणि चेतन साकारिया हे वुडचे विकेट्स ठरले. आयपीएलच्या इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा तो संयुक्त ८वा गोलंदाज आहे. त्याचवेळी, आयपीएलमध्ये ५ विकेट्सच्या क्लबमध्ये सामील होणारा तो दुसरा इंग्लिश गोलंदाज ठरला आहे. दरम्यान, त्याआधी २०१२ मध्ये दिमित्रीने हा पराक्रम केला होता. त्याने पंजाबकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध २५ धावांत ५ विकेट्स घेतले होते.

वुडचे आयपीएलमधील असे पुनरागमन सर्वांसाठी संस्मरणीय ठरले. खराब पदार्पणानंतर, त्याला प्रथम संघातून वगळण्यात आले आणि नंतर दुखापतीमुळे पुढील ४ सत्रांसाठी तो लीगमधून बाहेर राहिला.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा