चोरांची कमाल, सुरुंग लावून फोडलं एटीएम; स्फोट होताच लोक झाले जमा

नाशिक, १३ ऑगस्ट २०२२: सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रूक येथे चोरट्यांनी एटीएम फोडल्याची घटना घडलीय. ही घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावर घडलीय. आज पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास अज्ञान चोरट्यांनी चक्क सुरुंग लावून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केलाय.

पण जेव्हा स्फोट होताच मोटा आवाज झाल्यावर आजुबाजूचे लोक जमा व्हायला लागले तेव्हा चोरट्यांनी तेथून पळ काढला. स्फोटामुळं शटर आणि आतील काचेचा दरवाजा, सीलिंग व एसीच्या चिंधड्या उडाल्या. वावी पोलीस पेट्रोलिंगची गाडी तीन वाजता तेथून गेली होती. त्यानंतर ही घटना घडलीय.

आजपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी असल्यामुळं एटीएम मध्ये पैसे भरलेले असावे. या हेतूने चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असावा. बँक प्रशासनाकडून या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.

वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, उप निरीक्षक विजय सोनवणे, हवालदार सतीश बैरागी घटनास्थळी दाखल झाले. आता पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा