मोदींचे स्पष्ट संकेत, कायदे मागे घेणार नाही, आता चेंडू शेतकर्‍यांच्या खेम्यात

नवी दिल्ली, ९ फेब्रुवरी २०२१: नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांनी आपला जीव गमावला आहे. आंदोलनाच्या दरम्यान दिल्लीत हिंसाचार झाला, पण शेतकरी अजूनही त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. नवीन कृषी कायदे मागे घेण्या खेरीज त्यांना कोणतीही अट मान्य नाही.

त्याचबरोबर सरकारशी शेतकरी संघटनांच्या अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या मात्र, यातून कोणताही तोडगा निघाला नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील स्पष्ट संकेत दिले आहेत की हे कायदे मागे घेतले जाणार नाही. राज्यसभेत आपल्या भाषण दरम्यान पंतप्रधानांनी केवळ कायद्यात सुधारणा करण्याचा आग्रह धरला. अशा परिस्थितीत चेंडू आता शेतकर्‍यांच्या खेम्यात आहे. ते आंदोलन सुरू ठेवतील की ते बॅकफूटवर येतील, या प्रश्नांच्या उत्तरांची आता वाट पाहिली जात आहे. त्याचबरोबर विरोधकांची भूमिका काय असेल, हेदेखील पाहावे लागेल.

एमएसपी होते, एमएसपी आहे आणि एमएसपी राहील…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत आपल्या भाषणादरम्यान नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन संपविण्याचे आवाहन केले. पंतप्रधान म्हणाले की, एमएसपी होते, एमएसपी आहे आणि एमएसपी राहील, शेतकऱ्यांनी आंदोलन संपवायला हवे. सभागृहात केवळ आंदोलनाची चर्चा आहे, कायद्यातील सुधारणांवर चर्चा झाली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री यांना कृषी सुधारणा करताना देखील अडचणींचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाही. त्यावेळी डावे लोक कॉंग्रेसला अमेरिकेचा एजंट म्हणत असत, आज ते मला शिव्या घालत आहेत. पंतप्रधान म्हणाले की, कोणताही कायदा आला असला तरी, काही काळानंतर सुधारणा घडतात. या आंदोलनात बरेच वयस्कर शेतकरी देखील सामील झाले आहेत, त्यांनी घरी जावे. सध्या आंदोलन थांबले पाहिजे आणि चर्चा आंदोलन शिवाय देखील पुढे चालू राहू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा