नाशिक : निफाडच्या पाऱ्यात घसरण; थंडीच्या कडाक्यात वाढ

नाशिक, १० डिसेंबर २०२२: उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने निफाडचा पारा आज पुन्हा एकदा ७.२ अंशापर्यत खाली घसरला आहे. तर नाशिकमध्येही १० अंश तापमाण नोंदवण्यात आले. हवामानातील या बदलामुळे सर्वसामान्य गारठले आहेत.

बंगालच्या उपसागारातील चक्रीय स्थितीमुळे गेल्या आठवड्यात राज्यात ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ झाली होती. परिणामी ऐन थंडीत जिल्हावासीय घामाघूम झाले. मात्र दोन दिवसांपासून चक्रीयस्थिती निवळली असून हवामानात अचानक झालेल्या बदलाने द्राक्षबांगाना देखील फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक शहराचा पाराही १० अंशापर्यत खाली आल्याने हवेतील गारठा वाढला आहे. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांसह शेकोट्या पेटविल्या जात आहे. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातही वाऱ्यांचा वेग वाढल्याने नागरिकांना थंडी जास्त प्रमाणात वाजत आहे. दरम्यान, अजून काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढेल असा अदांज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा