नाशिक, २ ऑगस्ट २०२२: ओझरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या अपहरणाच्या घटना सातत्याने घडत होत्या. लहान मुलींचे अपहरण करुन परराज्यात विकणारी टोळी ओझरमध्ये सक्रिय झाली होती. यामुळे पोलिसांचे धाबे दाणाणले होते. मात्र, आता मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलंय.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी चार आरोपींना पकडले असून त्यामध्ये दोन महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये ओझर शहरातील एका महिलेचा देखील समावेश आहे.
विशेष म्हणजे या टोळीला महाराष्ट्रतून नाही तर गुजरात आणि मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आलीय. ओझरमधील एक महिला पैशांसाठी हे सर्व करत असल्याचे पुढे आलंय. आरोपींना अटक केली असून अजून काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
ज्या मुलींचे अपहरण करण्यात आले त्यासर्व दहा ते बारा वयोगटातील मुली आहेत. आरोपींनी पंचवटी, सातपूर, फुलेनगर इथल्या मुलींना फुस लावून पळवून नेण्याची कबुली दिली आहे. ओझर गु्न्हे शोध पथक पाच दिवस गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये तळ ठोकून होते. आशा प्रकारे पोलिसांना मोठे यश मिळाले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर