पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी संबोधून केला अपमान: प्रियंका गांधी

नवी दिल्ली, १० फेब्रुवरी २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंदोलनावरील विधानावर विरोधकांकडून सतत निशाणा साधला जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी असे म्हटले आहे की पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी ‘आंदोलनजीवी’ वापरलेला हा शब्द अपमानास्पद म्हटला आहे. प्रियंका गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना संसदेत आंदोलनजीवी असे संबोधले. असे म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आंदोलनजीवीचा नेमका अर्थ काय?

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी किसान पंचायतीमध्ये सांगितले की पंतप्रधानांनी संसदेत शेतकऱ्यांचा निषेध करत त्यांना आंदोलनजीवी म्हटले. आंदोलनजीवी म्हणजे काय? शेतकरी हे आंदोलन आपल्या मातीसाठी करत आहेत, आपल्या देशासाठी तसेच देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांसाठी हे आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना देशद्रोही बोलणारा, त्यांची टिंगल करणारा, तसेच त्यांना आतंकवादी घोषित करणारा हा केव्हाही देशभक्त होऊ शकत नाही.

शेतकर्‍यांची चेष्टा केली: प्रियंका

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी एकदाही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत, याची आलोचना करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, मोदी पाकिस्तान, चीन अमेरिका या प्रत्येक देशात भेट देऊन आले आहे. परंतु, ज्या शहरात राहतात त्या शहराच्या सीमेपर्यंत जाण्यास देखील त्यांना वेळ नाही.

त्या पुढे म्हणाल्या की, परंतु संसदेत त्यांनी शेतकर्‍यांची चेष्टा केली. जे शेतकरी या आंदोलनादरम्यान शहीद झाले त्यांचा मोदींनी आदर केला नाही. त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला. जो देश विकण्यास काढत आहे, हवाई अड्डे, रेल्वे, एअरलाइन्स विक्रीस काढले आहे, त्या व्यक्ती कडून आपण काय अपेक्षा ठेऊ शकतो?

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा