पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

लोणावळा ,१० ऑक्टोबर २०२० : पुणे – मुंबई दृतगतीवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली साखरेची पोती घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटला.या भीषण अपघातात साखरेच्या पोत्याखाली अडकल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार दिनांक १० ऑक्टोबर,२०२० रोजी सकाळी पावणेआठ च्या दरम्यान घडली आहे.

तसेच पोलिसांनी दिलेल्या अहवालात,पुण्याहून मुंबई च्या दिशेने साखरेची पोती घेऊन निघालेला ट्रक (ट्रक चा नंबर के. ए.२८ डी. ५१९६ ) असा होता. माहितीनुसार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ताबा सुटल्यामुळे ट्रक अमृतांजन पुलाखाली उलटला. याच अपघातात साखरेच्या पोत्याखाली दाबल्या गेल्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलिसांना अपघात झाल्याची माहिती मिळताच बोरघाट येथील पोलिस कर्मचारी व अधिकारी , आय आर बी चे पथक , अपघातग्रस्तांच्या मदतीला या संघटनेचे सदस्य , लोकमान्य रुग्णालयाची यंत्रणा व स्थानिक नागरिकांनी या घटनास्थळावर जात क्रेनच्या साहाय्याने ट्रक व पोती बाजूला केली. आणि मृत झालेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले .

आज झालेल्या अपघातानंतर खालापूर फूड मॉल जवळील हा दुसरा अपघात झाला आहे. यामध्ये एका ट्रेलरला मागून दुसऱ्या ट्रेलर ने धडक दिली. तसेच या भीषण अपघातात देखील एकाचा मृत्यू झाला. दरम्यान , दोन्ही अपघातातील मृतांच्या नावांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही. तसेच या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा