मुंबई, ८ फेब्रुवारी २०२३ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले पतधोरण जाहीर केले असून त्यानुसार रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. हा रेपो रेट ०.२५ बेसिस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे होमलोन महागणार आहेत. तसेच बेरोजगारी आणि महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज बैठकीत झालेल्या निर्णयाची घोषणा केली. बँक ऑफ इंडियाने आपले पतधोरण जाहीर केले असून त्यानुसार रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. हा रेपो रेट ०.२५ बेसिस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे होमलोन महागणार आहेत. तसेच बेरोजगारी आणि महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज बैठकीत झालेल्या निर्णयाची घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉईंटने वाढ केल्यामुळे आता रेपो रेट ६.२५ वरुन ६.५० वर पोहोचला आहे. SDF दर ६ टक्क्यांवरुन वाढून ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयने सलग सहाव्यांदा रेपो दारात वाढ केली आहे. यापूर्वी आरबीआयने महागाई रोखण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये रेपो रेट ३५ बेसिस पॉईंटने वाढ केली होती. त्याच वेळी, रेपो दरात सप्टेंबर २०२२ मध्ये ५० बेसिस पॉइंट्स, ऑगस्टमध्ये ५० बेसिस पॉईंट्स, जूनमध्ये ५० बेसिस पॉईंट्स आणि मे मध्ये ४० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली होती.
सहापैकी चार जणांनी बैठकीमध्ये रेपो रेट वाढवण्याच्या बाजूने मत दिले आहे. त्यामुळे या बैठकीत रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असेही शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, बँक आपले कर्ज दर रेपो दरांच्या दरांवरूनच ठरवते. दर वाढले तर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज अशी सर्व प्रकारची कर्जे महाग होतात. गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज यांचे व्याजदर वाढल्याने मुदत ठेवींवरील व्याजदर देखील वाढतात. पुढे ते म्हणाले, या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ५.६ टक्के राहण्याची शक्यता आहे. तर २०२४ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के राहण्याची शक्यता आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.