कर्जतमधील त्या कामाला स्थगिती दिल्याने रोहीत पवार नाराज; ट्वीट करत मुख्यमंत्र्याना केली ही विनंती

अहमदनगर १८ जुलै २०२२: राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेन्द्र फडणवीसांनी नवीन सरकार स्थापन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडा़मोडीनां प्रचंड वेग आला आहे. सत्तेत येताच शिंदे आणि फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांच्या कर्जतला दिवानी न्यायालय मंजूर करुन आणण्याच्या निर्णयालाही शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावर आता रोहीत पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट करत शिंदे सरकारने मविआचे निर्णय रद्द केल्याने सडकून टीका केली आहे. रोहीत पवार यांनी लिहिलं; माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीक पे तारीक ‘ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्ष पाठपुरावा करुन मविआ सरकार असताना मी कर्जतला दिवानी न्यायालय मंजूर करुन आणलं.

पण, या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली; पुढे ते म्हणाले ‘कदाचीत’ राज्य पातळीवरील मोठ्या निर्णयांना स्थगिती देताना तालूका पातळीवरील दिवानी न्यायाल्यासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती निर्णय झाला असावा. त्यामुळं माझी मुख्यमंत्राना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिश: लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी:

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा