राज्यात एसटी बसचे ४६ डेपो बंद ठेवल्याने १३.२५ कोटींचे नुकसान, मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३ : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) २५० पैकी किमान ४६ बस डेपो पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून, महामंडळाचे गेल्या काही दिवसात १३.२५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

एमएसआरटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, निदर्शनांमुळे अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये बस संचालनावर गंभीर परिणाम झाला आहे. ते म्हणाले की, गेल्या तीन दिवसांत झालेल्या आंदोलनात २० बसेस जाळण्यात आल्या आणि १९ बसेसचे नुकसान झाले.

बसेसचे नुकसान झाल्याने महामंडळाचे ५.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, राज्याच्या विविध भागांत झालेल्या आंदोलनामुळे तिकीट विक्रीत आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. MSRTC ही १५,००० बसेसच्या ताफ्यासह देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था आहे. त्यांच्या सेवेवर दररोज सुमारे ६० लाख लोक प्रवास करतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा