सैनिक समाज पार्टीचा पुण्यातून यलगार सैनिक हो तुमच्यासाठी

पुणे, २२ फेब्रुवारी २०२२ : आगामी निवडणुकांसाठी सैनिक समाज पार्टी ने धोरण आखले असून संपूर्ण महाराष्ट्रभर पार्टी चे काम जोरात सुरू आहे. काल रात्री दिनांक २१ फेब्रुवारी रोजी पुण्यातील बैठकीमधे आगामी निवडणूकी संदर्भात आवश्यक मुद्द्यावर चर्चा झाली असून त्यानुसार एक सुनियोजित कार्यप्रणाली ठरवण्यासाठी सैनिक समाज पार्टी ची बांधणी सुरू झाली आहे.

चर्चेमधे सैनिकांच्या व त्यांच्या परिवाराच्या तसेच किसान पुत्र आणि त्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्या हेतूने लवकरच धोरणे आखली जातील तसेच, सैनिक पुत्र हा मुळातच भूमिपुत्र असतो अर्थात किसानच असतो म्हणूनच त्यांच्या समस्या सैनिक किंवा किसानच समजू शकतो या हेतूने आम्ही सैनिक समाज पार्टी अगोदर सक्रिय देशसेवा करून देशाचे रक्षणार्थ स्वतः सिद्ध करूनच आता सेवानिवृत्ती नंतर देशांतर्गत निर्माण झालेले असुरक्षा कवच फोडून देशाला सुजलाम् सुफलाम् करण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे ध्येपूर्तीसाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपल्या सेवसाठी तत्पर आहोत, अशा मुद्द्यांवर चर्चा झाली.

कालच्या या बैठकीमधे सैनिक समाज पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष कॅप्टन अरुण कदम, नियोजित पुणे शहर अध्यक्ष तुकाराम डफळ, नियोजित कार्याध्यक्ष सुभेदार राजेंद्र खंडारे व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व सहमतीने लवकरच पुणे जिल्हा व राज्यातील इतर विभागातून मोर्चा बांधणी सुरू केली जाणार असून, सर्व सैनिक बांधवांना तसेच सर्व संघटनांना आम्ही सहृदय निवेदन करतो की आपण आपल्या संघटना जशा आहेत तशा प्रकारे चालू ठेऊन आपल्या हक्काचा एक आपला राजकीय पक्ष म्हणून सैनिक समाज पार्टी सोबत आपली स्वीकृती दाखवून द्यावी अशी विनंती कालच्या बैठकीत करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा