स्वरूप आणि चिकित्सा’ या लेखक बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीवर पुणे येथे परिसंवाद

पुणे, २१ ऑक्टोबर २०२३ : श्री.दिपलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित लि.यांच्यावतीने आयोजित कादंबरी परिसंवाद कार्यक्रमात, लेखक श्री.बाळासाहेब लबडे यांच्या ‘स्वरूप आणि चिकित्सा’ कादंबरीवर, शुक्रवार दिनांक २७/१०/२०२३ रोजी पुण्यातील नवीपेठ पत्रकार भवन येथे सायं ५.३० वा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात निर्मितीप्रक्रिया भाष्य प्रा.डॉ.बाळासाहेब लबडे(कादंबरीकार ,कवी,गीतकार, गझलकार, समीक्षक, संपादक,अभ्यासक)करणार आहेत तर कादंबरी भाष्यात “पिपिलिका मुक्तिधाम” (संस्कृती प्रकाशन, पुणे) यावर वक्ते प्रा.डाँ नागनाथ बळते (समीक्षक,प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) बोलणार आहेत. तसेच “शेवटची लाओग्राफिया”(अथर्व पब्लिकेशन, जळगाव.) वक्ते म्हणून श्री.लक्ष्मीकांत देशमुख (ज्येष्ठ साहित्यिक,माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), “काळमेकर लाइव्ह” (पद्मगंधा प्रकाशन,पुणे) वक्ते म्हणून प्रा.डाँ दिपक बोरगावे (ज्येष्ठ समीक्षक,कवी,अनुवादक)बोलणार आहेत. तर अध्यक्ष या नात्याने अध्यक्षीय मनोगत श्री.भारत सासणे (ज्येष्ठ साहित्यिक ,माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) यांचे असणार आहे

या परिसंवादास प्रमुख अतिथी म्हणून श्री.शिरिष चिटणीस (लेखक आणि अध्यक्ष श्री दिपलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित लि. सातारा) असतील, तर श्री.दि.बा.पाटील(ज्येष्ठ साहित्यिक सांगली), डाँ श्रीकांत पाटील(कवी, कादंबरीकार, समीक्षक, कोल्हापुर), श्री बबन धुमाळ (गझलकार पुणे) यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर (प्रसिद्ध शाहीर,कवी,पत्रकार,संपादक) करतील. तर आभार डाँ संजय बोरूडे मानतील.

प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे हे समीक्षक, कादंबरीकार, कवी, गझलकार, गीतकार, संशोधक,संपादक, नामवंत वक्ते,अनेक राज्यस्तरिय व राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी आहेत. विविध वाहिन्यांवर तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी कविता मनामनातली, खारवी बोलीच्या कविता, विडंबन कविता असे कार्यक्रम सादर केले आहेत. ते पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष , खरे- ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर, जि.रत्नागिरी येथे गेल्या २५ वर्षांपासून मराठी विभागप्रमुख म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. तर १० विद्यार्थ्यी संशोधन करीत आहेत. त्यांची एकूण १६ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील “पिपिलिका मुक्तिधाम”, “शेवटची लाओग्राफिया “, “काळमेकर लाइव्ह सारख्या नवकादंबरींचे लेखन त्यांनी केले आहे. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्या नंतर मुंबईचे दखलपात्र चित्रण करणारा “मुंबई बंबई बाँम्बे” कवितासंग्रह, चित्रे -कोलटकर यांच्यानंतर “महाद्वार” सारखा मराठी कवितेत मैलाचा दगड ठरलेला कविता संग्रह, ब्लाटेंटिया, एक कैफियत सारखे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

अनोखी” शेवटची लाओग्राफिया” ही कादंबरी, “१९९० नंतरची थीम कविता” हे त्यांचे मराठीतील पहिले प्रायोगिक संपादन. “एक कैफियत” सारखा भन्नाट गझल संग्रह, “वाटर स्टोरिज” या सनस्टोन प्रकाशन अमेरिका प्रकाशित पुस्तकातुन त्यांच्या दोन कथा कॅनडा, युरोप, जर्मनीसह जगभरातील ग्रंथालयात पोहचल्या आहेत. ” शिष्यवृत्ती” “नौटंकी” या आगामी चित्रपटासाठी त्यांची गाणी आहेत. मराठीतील दिग्गज समीक्षक रत्नाकर मतकरी, डॉ नागनाथ कोत्तापल्ले, डॉ.रावसाहेब कसबे,डॉ.आनंद पाटील ,डॉ.लुलेकर, लक्ष्मीकांत देशमुख, ए. के.शेख, डॉ.सांगोलेकर या दिग्गजांनी दखल घेऊन त्यांचे स्थान अधोरेखित केले आहे. या कार्यक्रमाचा बौद्धीक आनंद घ्यावा असे आवाहन निमंत्रक श्री दिपलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित लि.सातारा यांच्या सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सिद्धेश शिगवण

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा