बारामती, १८ ऑक्टोबर २०२०: पुणे चेंबर गुळ असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी बारामतीमध्ये माजी कृषी मंत्री शरद पवार यांना भेटून सध्या गुळ व्यवसायात असणाऱ्या अडचणींबाबत व मार्केट कमिटीच्या सेसबाबत चर्चा केली व पवार यांना निवेदन देण्यात आले.
बारामतीमध्ये झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी गूळ व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या व गुरुवारी दि. २२ ऑक्टोबरला मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणाऱ्या गुळ व्यापारी व संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित केली असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. मुंबई येथील बैठकीत गुळ व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे शरद पवार यांनी गुळ व्यापाऱ्यांना सांगितले आहे.
या बैठकीवेळी राजेंद्र गुगळे, मोहन ओसवाल, अजित सेठिया, बाबूशेठ म्हसवडकर निरा, बारामतीचे माजी नगराध्यक्ष जवाहरशेठ बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यावेळी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव