मढी यात्रेतून मोटरसायकल चोरणारा चोर शेवगाव पोलिसांकडून जेरबंद

अहमदनगर, ७ एप्रिल २०२४ : मढी यात्रेतून मोटरसायकल चोरणारा चोर शेवगाव पोलिसांनी जेरबंद केला आहे. या प्रकरणातील आरोपी वैभव लक्ष्मण हिवाळे (वय २२ वर्षे रा. शहरटाकळी ता. शेवगाव) याने ४ एप्रिलला पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील चैतन्य कानिफनाथ मढी यात्रेतुन दुचाकी वाहनाची चोरी केली होती. या चोराविरोधात शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास सुरू असता सदर चोर पकडला गेला.

सदर चोरकडे विचारपूस केली असता त्या चोराने आणखीन २ दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत पाथर्डी व सोनई पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता सदर चोरावर त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सदर चोरास आणि त्याने चोरलेल्या दुचाकी वाहनास शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई ही पो.नि. दिगंबर भदाणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर काळे, उमेश गायकवाड, संदिप आव्हाड, शाम गुंजाळ, बप्पासाहेब धाकतोडे, कृष्णा मोरे, संपत खेडकर आणि संतोष वाघ यांनी केली असुन पुढील तपास पाथर्डी व सोनई पोलीस स्टेशन हे करत आहेत. मोटार सायकल मालकांना त्यांच्या मोटार सायकल मिळून आल्याने त्यांनी पोलीसांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रवींद्र उगलमुगले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा