शिवेंद्रराजेंची भेट ही विकासकामांसंबंधी होती – अजित पवार

बारामती २४ जानेवारी २०२१ : विधानसभा निवडणुकित भाजपवासी झालेले साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी रविवार (दि.२४) रोजी बारामतीमध्ये अजित पवार यांची भेट घेतली.त्यांची बराचवेळ बंद खोलीमध्ये चर्चा झाली याविषयी अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले शिवेंद्रराजे त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसंबंधी चर्चा करण्यासाठी आले होते. कामसंबंधी आमची चर्चा झाली राज्याच्या उपमुख्यमंत्री या नात्याने अनेक विरोधी पक्षाचे नेते आपापली कामे घेवून मला भेटत असतात, त्यात वेगळे काही नाही,असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

शिवेंद्रराजे यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी एक बैठक निश्चित करायची आहे, त्यासाठी ते आले होते. तुमच्या कामांसंबंधी मंत्रालयात दोन बैठका लावतो, असे मी शिवेंद्रराजेंना सांगितले असल्याचेही पवार म्हणाले. मी पाच वर्षे विरोधी पक्षात असताना माझ्या विकासकामांसाठी त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडे जात होतो.तसेच भाजपने प्रवेश करण्यासाठी मला १०० कोटींची आॅफर दिली होती, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता. याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, त्यावर २७ तारखेला मुंबईत गेल्यावर शिंदे यांच्याशी इंत्यभुत चर्चा करेन. कुणी ऑफर दिली ? कशासाठी दिली ? त्याच्या पाठीमागे कारण काय? यावर माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर बोलणं उचित नाही, असेही यावेळी पवार म्हणाले.नोकरभरतीत कोणताही घटक वंचित राहणार नाही सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण व पोलिस विभागात अनेक वर्षांपासून जागा रिक्त आहेत.जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या विभागांची भरती करणे गरजेचे आहे. कारण सध्या तिथे अत्यंत अपुरे मनुष्यबळ आहे.भरती झाल्यानंतर पोलीस कामाला यायला एक वर्ष लागते.मध्यंतरी असे वाटत होते की सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, तो सुटेल.पण ते फेब्रुवारीपर्यंत पुढे गेले.परंतु सरकारी नोकर भरती करत असताना समाजातील कोणताही घटक वंचित राहणार नाही, याची खबरदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा असेल असे पवार म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा