धक्कादायक! एकाच कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण

मुंबई : ५ सप्टेंबर २०२०

गणेशोत्सवादरम्यान सर्व कुटुंब एकत्र येत असते. हा सण सर्वजण मिळून मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यंदा कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर पसरलेले असताना कल्याणमधील एकाच कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच गणपती दरम्यान हे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते.

कल्याणमध्ये असलेल्या जोशीबाग परिसरातील एका चार मजली इमारतीमध्ये राहणाऱ्या एका मुलाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर इमारतीत राहणाऱ्या ४० लोकांची कोरोना चाचणी केली असता. त्यापैकी ३० जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तसेच महिनाभर शांत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हा गणेशोत्सवानंतर काहीसा वाढतांना दिसून आला आहे.

दरम्यान , सध्या ठाणे जिल्ह्यात शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२० रोजी १ हजार ६४३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत यामुळेच रुग्णांची एकूण संख्या ही १ लाख ३० हजार ७२ पर्यंत पोहोचली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा