जम्मू-काश्मीरच्या पंपोरमध्ये SI फारूख अहमद यांची हत्या, दहशतवाद्यांनी अपहरणानंतर केले ठार

जम्मू-काश्मीर, 18 जून 2022: जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह भातशेतीत पडलेला आढळून आला. एसआयची हत्या झाली आहे. दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणल्याचे मानले जात आहे. मृतदेह पाहिल्यानंतर एसआयचे अपहरण करून निर्जनस्थळी नेऊन गोळ्या झाडून मृतदेह फेकून दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत एसआय यांचं नाव फारुख अहमद मीर मुलगा गनी मीर सध्या रा. सांबुरा पंपोर असे आहे.

पोलिसांनी सांगितले की, एसआयचा मृतदेह सांबुरा येथील भाताच्या शेतात पडलेला आढळला. फारुख सध्या लेथपोरा येथे 23 Bn IRP मध्ये OSI म्हणून तैनात होते. सुरुवातीला छाती जवळ गोळीचा घाव सापडला होता.

दोन दिवसांपूर्वी अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला होता. यामध्ये एक तरुण जखमी झाला. ही घटना पादशाही बाग परिसरातील आहे. अहमदउल्ला असे जखमी पोलिसाचे नाव असून तो हेड कॉन्स्टेबल होता.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांसाठी हायब्रीड दहशतवादी हे नवे आव्हान बनले आहे. गेल्या 2 महिन्यांत काश्मीरमध्ये हायब्रीड दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या 6 घटना घडल्या. दहशतवाद्यांचा हा नवा मार्ग असून संकरित दहशतवादी असल्याचा दावा करणारे बहुतांश सदस्य लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल सातत्याने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावत आहेत. यापूर्वी सुरक्षा दलांनी लष्कराच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरमधील कुलगा चकमकीत बँक मॅनेजर विजय कुमारचा मारेकरीही मारला गेला. शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दुसरे मोठे यश कुलगाममध्ये मिळाले. येथे कुजार भागात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला घेरले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा