राज्यातील लाॅकडाऊन १ जूनपर्यंत, वाचा निर्बंध….

मुंबई, १४ मे २०२१: कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात अजूनही तसाच दिसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र, धोका अजून टळलेल्या नाही म्हणून राज्य सरकारनं राज्यातील लाॅकडाऊन १ जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सध्या जे निर्बंध आहेत ते १ जूनपर्यंत तसेच राहणार असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळं मंत्रीमंडळातील बऱ्याच नेत्यांनी हा लाॅकडाऊन वाढवला जावा म्हणून केबिनेट बैठकीत मागणी केली.

काय आहेत निर्बंध….

सकाळी : ७ ते ११ : किराणा दुकान

सकाळी : ७ ते ११ : दुध आणि दुग्धजन्य पदार्थ

सकाळी : ७ ते ११ : भाजीपाला विक्री

सकाळी : ७ ते ११ : फळे विक्री

सकाळी : ७ ते ११ : मटण,चिकन,मासे,अंडी विक्री

सकाळी : ७ ते ११ : कृषी सेवा

सकाळी : ७ ते ११ : पशुखाद्य विक्री

सकाळी : ७ ते ११ : बेकरी,मिठाई दुकाने

सकाळी : ७ ते ११ : सर्व प्रकारची खाद्य दुकाने

सकाळी : ७ ते ११ : प्राण्याची खाद्य

सकाळी : ७ ते ११ : पावसाळ्यात संबंधी वस्तूची दुकाने

तर आता राज्यात १ जूनपर्यंत असे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लाॅकडाऊन वाढवल्यामुळे विरोधक हे आघाडी सरकारवर टीका करतायत. तर राज्यातील अनेक नागरिकांनी याला पाठिंबा दिलाय. या वाढवलेल्या लाॅकडाऊन च्या बाबतीत आघाडी सरकार बाबतीत समिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा