गुजरात दंगलप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२२ : गुजरात मध्ये २००२ साली झालेल्या दंगली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तिस्ता सेतलवाड यांना अंतरिम जामीन मंजूर केला.गुजरात दंगलीनंतर सरकार विरोधात कट रचल्याच्या आरोपांखाली सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून त्या अटकेत होत्या. तिस्ता सेटलवाड यांच्यावर साक्षीदारांची खोटी विधाने तयार करण्याचा आणि दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नानावटी आयोगासमोर हजर केल्याचा आरोप आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली असून तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू यू लळित, न्यायामूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू भट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. गुजरात दंगलप्रकरणी खोटी कागदपत्रे तयार करुन अनेकांना त्यामध्ये अडकवण्यचा प्रयत्न केला. असा आरोप सेटलवाड यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी २५ जूनपासून सेटलवाड अटकेत होत्या. त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टला असलेली सुनावणी सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलली होती. त्याविरोधात सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.

गुजरात दंगलीच्या तिस्ता सेटलवाड कोण आहेत?

तिस्ता सेटलवार एक पत्रकार असून त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सिटीजन फॉर जस्टिस ऍड पिस एनजीओ (NGO) ज्या सचिव आहेत. तसेच २००२ मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार मिळाला आहे.आणि २००७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक कामे केल्याने पद्मश्री पुरस्कार ने सन्मानित केले आहे. तिस्ता २५ जूनपासून अटकेत होत्या. पण आज त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा