आजच्याच दिवशी झाला होता संसद भवनावर आतंकवादी हल्ला…

नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२०: १३ डिसेंबर २०२० रोजी आज देशाची राजधानी दिल्ली येथील संसद भवनावरील हल्ल्याचा १९ वा वर्धापन दिन आहे. याच दिवशी साल २००१ मध्ये लोकशाहीच्या मंदिरामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. कडक बंदोबस्त आणि सुरक्षारक्षक असतानादेखील दहशतवादी संसद भवनाच्या आवारा मध्ये पोहोचले होते. ही घटना सर्वांसाठी धक्कादायक होती.

ज्यावेळी हा हल्ला झाला. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू होते. संसदेच्या दोन्ही सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आल्या होत्या. दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी यांनी संसद भवन सोडलं होतं. मात्र, संसद भवनात लालकृष्ण अडवाणी यांच्यासह इतर १०० लोक उपस्थित होते.

हल्ल्याच्या दिवशी संसद भवन संकुलात सकाळी पांढऱ्या रंगाची एम्बेसीडर गाडी जिजा नंबर डीएल -३ सीजे १५२७ होता वेगात प्रवेश करत या कारनं पहिल्या उपराष्ट्रपतींच्या कारला धडक दिली. त्यानंतर उपराष्ट्रपतींच्या कारच्या चालकानं दहशतवाद्यांची गाडी चालवणाऱ्या चालकाची कॉलर पकडली. चालकाला काही समजण्याआधी दहशतवाद्यांची बंदूक पाहून तो माघारला. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस एएसआय’नं दहशतवाद्यांवर आपली रिव्हॉल्व्हर रोखली, त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

जिथं देशाची धोरणं आणि कायदे ठरवली जातात त्या ठिकाणी आता युद्धभूमीचं वातावरण निर्माण झालं होतं. ना कुठल्या नेत्यांचा आवाज ना कोणती धावपळ, आवाज येत होता तो फक्त बंदुकीच्या गोळ्यांचा. गोंधळाच्या वातावरणादरम्यान एका दहशतवाद्यानं संसद भवनाच्या गेटजवळ स्वत: ला उडविलं. हल्ल्याच्या कारवाया वाढत असताना सुरक्षा दलांनी मोर्चा काढून दहशतवाद्यांचा खात्मा केला.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी हमजा, हैदर उर्फ ​​तुफैल, राणा, रणविजय आणि मोहम्मद यांचा समावेश आहे. भारतीय कोर्टाच्या म्हणण्यानुसार मौलाना मसूद अझर, गाझी बाबा उर्फ ​​अबू जेहादी आणि तारिक अहमद हेही या हल्ल्यात सहभागी होते. तपासादरम्यान हल्ल्याचा मास्टरमाइंडची नावंही समोर आली होती.

मोहम्मद अफजल गुरू, शौकत हुसेन (अफझल गुरूचा चुलत भाऊ) एस.आर. गिलानी यांच्यासमवेत पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय होती. या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अफजल गुरूला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली होती.

या हल्ल्यात पाच दहशतवाद्यांसह एकूण १४ जण ठार झाले. घटनास्थळी प्रथम हवालदार कमलेश कुमारी यादव शहीद झाले. या घटनेत दिल्ली पोलिसांचे ६ सैनिक आणि संसद भवनाच्या सुरक्षा सेवेतील दोन कर्मचारी आणि संसदेचे एक माळी मारले गेले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा