ट्विटर वॉर, अमित मालवीय यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल तुम्ही अपयशी मुख्यमंत्री आहात

नवी दिल्ली, २२ जुलै २०२३ : दोन महिन्यांपासून मणिपूर राज्य धुमसतं आहे. येथे दोन समाजात सुरू असलेल्या वादामुळे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत जात आहे. दरम्यान, मे महिन्यात घडलेल्या एका विकृत घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. यावरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. यावर भाजपचे नेते अमीत मालवीय यांनी देखील ट्वीट करत उत्तर दिलं आहे. अमित मालवीय यांनी ट्वीट करत पश्चिम बंगालमध्ये पंचायत समितीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. तसेच तुम्हाला लाज वाटते का असा सवाल विचारत ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे.

ममता बॅनर्जींच्या ट्वीटला उत्तर देत अमित मालविय यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी पश्चिम बंगलामध्ये झालेल्या पंचायत समितीच्या हिंसाचाराचा संदर्भ दिला आहे. त्यांनी म्हटलं की, ८ जुलै २०२४ रोजी पंचायत निवडणुकीच्या दिवशी एका महिला उमेदवाराला मारहाण करण्यात आली. हावडा येथे तिची विवस्त्र धिंड काढली गेली, तिचे कपडे फाडण्यात आले. तेव्हा पोलीस तक्रार देखील नोंदवून घेत नव्हते. भाजपने आग्रह केल्यानंतर तुमच्या पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळी गृहमंत्री म्हणून तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखणं गरजेचं होतं असं म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘तुम्ही एक अपयशी मुख्यमंत्री आहात, तुम्ही बंगालवर लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिला आहे. तसेच तुमचे तुटलेले हृदय, आक्रोश आणि न्यायाची खोटी चिंता न करता हे जग खूप चांगले आहे असं म्हणत अमित मालविया यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्र सोडलं. ‘

ममता बॅनर्जी यांचं ट्विट
मणिपूरमधील व्हिडीओ पाहून अत्यंत वाईट वाटल्याचं ममता बॅनर्जी यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, मणिपूरमध्ये उन्मादी जमावाने दोन आदिवासी महिलांसोबत जे रानटी कृत्य केले, ते पाहून हृदयाला वेदना झाल्या आणि संतापही आला. उपेक्षित महिलांना जो हिंसाचार सोसावा लागत आहे, त्या वेदना शब्दात सांगता येत नाहीत. अशी अमानवीय कृत्य करणाऱ्या समाजकंटकांविरोधात आपल्याला एकजुटीने आणि ताकदीने उभे राहावे लागेल आणि त्यांचा निषेध करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा लागेल.

दोन महिन्यांपासून मणिपूर राज्य धुमसतं आहे. येथे दोन समाजात सुरू असलेल्या वादामुळे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्षात या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतरही मणिपूर शांत करण्यास केंद्र सरकारला यश मिळालेले नाही. पावसाळी अधिवेशनात मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. घडलेल्या या घटने नंतर आता मणिपूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कोणती कठोर पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा