वंदे भारत एक्स्प्रेसला गुजरात मध्ये मनीनगर येथे अपघात, रेल्वेच्या समोरील भागाचे मोठे नुकसान

मनीनगर, ७ ऑक्टोबर २०२२ : गुजरातमधील मनीनगर येथे वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातग्रस्त रेल्वे गांधीनगरहून मुंबईच्या दिशेने येताना जनावरांचा कळप लोहमार्गावर आडवा आल्याने अपघाताची घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त रेल्वेच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे मात्र तरी ही रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पश्चिम रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.

एक ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. सेवेत दाखल झाल्यानंतर सहाव्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास वटवा ते मनीनगर दरम्यान हा अपघात झाला आहे.

मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड रेल्वे आहे. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने ही रेल्वे धावते. त्यामुळे अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास प्रवाशांसाठी कमी वेळात सुकर ठरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा