५७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने रचला होता इतिहास, १२ सप्टेंबर आजचा दिनविशेष

पुणे, १२ सप्टेंबर २०२३ : इतिहासात १२ सप्टेंबरचा दिवस हा देशाचा महान जलतरणपटू मिहिर सेन यांच्या कर्तृत्वाशी निगडीत आहे. मिहिर सेन हा एक उत्कृष्ट लांब पल्ल्याच्या जलतरणपटू मानला जातो. इंग्लिश चॅनेल ओलांडून आपल्या लांब पल्ल्याच्या जलतरण मोहिमेची सुरुवात करणाऱ्या मिहिर सेनने, धैर्याने आणि दृढनिश्चयाने महासागर पार करण्यात यश मिळवले आणि १२ सप्टेंबर १९६६ रोजी त्याने पोहून डार्डनेलेस सामुद्रधुनी ओलांडली आणि डार्डनेलेस ओलांडणारा तो जगातील पहिला माणूस ठरला.

मिहिर सेन हे पाच महाद्वीपातील सातही समुद्र पार करणारे जगातील पहिले व्यक्ती होते. १६ नोव्हेंबर १९३० रोजी पुरुलिया, पश्चिम बंगाल येथे जन्मलेल्या मिहिर सेन यांना त्यांच्या धाडसी आणि अतुलनीय कामगिरीमुळे भारत सरकारने १९५९ मध्ये ‘पद्मश्री’ आणि १९६७ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात १२ सप्टेंबर या तारखेला नोंदवलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे.

•१७८६ : लॉर्ड कॉर्नवॉलिसने गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला.
•१८७३ : पहिल्या टाइपरायटरची विक्री सुरू झाली.
•१९२८ : फ्लोरिडामध्ये भीषण वादळामुळे ६००० लोक मरण पावले.
•१९४४ : अमेरिकन सैन्य प्रथमच जर्मनीत दाखल झाले.
•१९५९ : तत्कालीन सोव्हिएत युनियनचे रॉकेट ‘लुना २’ चंद्रावर पोहोचले.
•१९६६ : भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने डार्डनेलेस सामुद्रधुनी पोहून पार केले.
•१९६८ : अल्बानियाने वॉर्सा करारापासून वेगळे होण्याची घोषणा केली.
•१९९० : अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, सोव्हिएत युनियन, पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांनी पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणासाठी करारावर स्वाक्षरी केली.
•१९९१ : स्पेस शटल एसटीएस-४८ अंतराळात सोडले.
•२००१ : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध घोषित केले.
•२००४ : उत्तर कोरियाने आपला आण्विक कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
•२००६ : सीरियाची राजधानी दमास्कस येथील अमेरिकन दूतावासावर हल्ला.
•२०१२ : Apple ने iPhone 5 आणि iOS 6 लाँच केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा