मुंबई, २६ ऑगस्ट २०२०: अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी आता तीन एजन्सी करीत आहेत. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) नंतर नॉरकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करेल. हे ड्रग्स कनेक्शन प्रकरण रिया चक्रवर्ती हिच्या सोशल मीडियावरील चॅटच्या माध्यमातून समोर आले आहे. एनसीबी आता याची चौकशी करेल.
आज एनसीबीचे संचालक राकेश अस्थाना अधिकाऱ्यांसमवेत चौकशीची योजना आखतील. एनसीबीचे कोणते घटक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत हे बैठकीत ठरवले जाईल. काल संचालक राकेश अस्थाना म्हणाले की, एनसीबी सुशांत प्रकरणाची चौकशीही सुरू करीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने एनसीबीला पत्र लिहून म्हटले आहे की सुशांतशी संबंधित काही लोक ड्रग्ज घेत असत. काही लोकांचा ड्रग्स डीलरशीही संपर्क होता, त्यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आपला तपास मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहे. तपासाची व्याप्ती खूप मोठी असेल आणि दिल्ली, मुंबईचे मोठे व अनुभवी अधिकारी या तपासणीत गुंतले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
सुशांत प्रकरणाच्या तपासादरम्यान रिया चक्रवर्ती यांचे ड्रग कनेक्शनही समोर येत आहे. रियाच्या फोन चॅटविषयी माहितीनुसार एप्रिल रोजी मिरांडा सुशी नावाच्या व्यक्तीने संदेशात लिहिले- हाय रिया, माल जवळजवळ संपला आहे. मिरांडा नंतर लिहिताे – आम्ही शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का, परंतु त्याच्याकडे फक्त हॅश आणि बड आहे.
२५ नोव्हेंबर २०१९ रोजी रियाने जया शाहला निरोपात लिहिले- कॉफी, चहा किंवा पाण्यात फक्त ४ थेंब घाल आणि प्यायला दे… किक ( नशा येण्यासाठी) लागण्यासाठी ३० ते ४० मिनिटे द्यायची आहेत. तथापि, नंतर रियाच्या वकिलाने असा दावा केला आहे की, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत आणि रक्त तपासणीसाठी ती तयार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी