कर्जत, अहमदनगर ९ सप्टेंबर २०२३ : तालुक्यातील मिरजगाव येथे ट्रॉमा सेंटर होणार असून, यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या सेंटरसाठी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मिरजगाव येथे जिल्हा उपरुग्णालयासाठी नुकतीच निविदा सूचना निघाली आहे. ५० रुग्ण खाटांचे हे रुग्णालय आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारने मंजूर केला आहे.
मिरजगाव परिसरासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ट्रामा केंद्र आहे. मिरजगाव जवळून राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गावरवर अनेकदा अपघात होतात. उपचाराअभावी दुदैवाने अपघातग्रस्तांचा मृत्यू होतो, पण आता अद्यायावत रुग्णालय शासनाने मंजूर केल्याने त्याठिकाणी आरोग्य सुविधा मिळतील. सरकारच्या निर्णयाबद्दल भाजपचे संपत बावडकर, शेखर खरमरे, डॉ झरेकर, लहू वतारे, अभिजीत जवांदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर