गांजाने भरलेल्या कारने दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या लोकांना चिरडलं; 1 ठार, 26 जखमी

छत्तीसगड, 16 ऑक्टोंबर 2021: छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात एका धार्मिक मिरवणुकीत सामील असलेल्या लोकांना एका वेगवान कारने चिरडलं.  मिरवणुकीत सहभागी लोक दुर्गा विसर्जनासाठी जात होते.  कारच्या धडकेमुळं एकाचा जागीच मृत्यू झाला, तर 26 जण जखमी झाले.  जखमींपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.  जशपूरमधील पाथळगाव येथे ही घटना घडली.  या घटनेनंतर लोकांनी गाडीला आग लावली.  मिळालेल्या माहितीनुसार, ही कार गांजाने भरलेली होती.
हा अपघात शुक्रवारी दुपारी 1.30 च्या सुमारास जशपूरच्या पाथळगाव येथे झाला.  त्या वेळी लोक 7 दुर्गा पंडालच्या मूर्ती विसर्जनासाठी नदीकाठी घेऊन जात होते.  बाजाराच्या मध्यभागी मागून येणाऱ्या कारने मिरवणुकीत सहभागी लोकांना चिरडलं.  कारच्या धडकेमुळं गौरव अग्रवाल (21) नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर बँड वाजवणारे 4 लोक गंभीर जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की कारची गती 100 ते 120 असावी आणि ती थेट लोकांना धडकली.  या अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.  लोक असेही म्हणतात की आरोपी गांजा तस्कर आहेत.  त्यांनीच दुर्गा विसर्जनाशी संबंधित लोकांना चिरडलंय.
अपघातानंतर महामार्ग जाम
 या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी पाथळगाव पोलीस स्टेशनला घेराव घातला.  याशिवाय मृत व्यक्तीचा मृतदेह ठेवून गुमला-कटनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलाय.  पोलिसांनी एका एएसआयवर गांजा तस्करी केल्याचा आरोप केलाय.  त्यांचा आरोप आहे की आरोपी कारस्वार एएसआयसह गांजा तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते.  म्हणूनच आम्ही एएसआयवर कारवाई करण्याची मागणी करत आहोत.
जमावाने पेटवली कार
कारमधील व्यक्तीचं नाव काय होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही.  कारमध्ये किती गांजा आहे हे देखील माहित नव्हते. तेथील जवळच्या जमावानं त्याचा पाठलाग केला आणि त्याला 5 किमी दूर सुखरापारामध्ये पकडलं.  लोकांनी त्याला मारहाणही केली आणि गाडी पेटवली.  घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.  लोक पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा