अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल राव यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मुंबई, १८ एप्रिल २०२३: भाजपशी २५-३० वर्षे आम्ही राजकीय संबंध ठेवले, पण मित्र कोण आणि विरोधक कोण हे समजले नाही. देशातील लोकशाहीचा लढा एकत्रितपणे लढू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या भेटीनंतर दिली. तर मी मुंबईत काँग्रेस अध्यक्ष खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा संदेश घेऊन आलो. आम्ही भाजप विरोधातील लढाईत उद्धव ठाकरेंसोबत आहोत अशी भूमिका वेणुगोपाल यांनी स्पष्ट केली .

त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जवळपास अर्धा तास घालवला . यंदा नऊ राज्यांमध्ये निवडणुका आहेत,पुढच्या वर्षी २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपची परिस्थिती पाहता अनेकवेळा विरोधी पक्ष एकत्र येण्याची चर्चा करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी वेणुगोपाल यांनी थेट सरकारवर निशाणा साधला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप करत त्यांनी लोकशाही संपवली त्यांनी पुन्हा सर्व विरोधी पक्षांना एका आवाजात एकत्र येण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला . भाजपला हरवायचे असेल आणि देशात लोकशाही सुरळीत चालवायची असेल, तर सर्व पक्षांना एकत्र यावे लागेल, असे वेणुगोपाल म्हणाले. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आहेत आणि तेही याच्याशी पूर्णपणे सहमत असल्याचे त्यांनी सांगितले .

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा