BMW ची X5 फेसलिफ्ट SUV भारतात लाँच

मुंबई, १६ जुलै २०२३ : BMW इंडियाने आपल्या X5 SUV चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. BMW X5 या कारमध्ये डिझेल आणि पेट्रोल इंजिनचे असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. दोन्ही इंजिनसोबत माईल्ड-हायब्रीड सिस्टीम देखील देण्यात आली आहे. ही कार M-sport आणि xLine व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

BMW X5 फेसलिफ्टला पर्यायी स्टायलिश ग्रिल डिझाईन बंपर आहे. याबरोबरच स्लिमर हेडलाईट्स देण्यात आले आहेत, तसेच BMW चा सिग्नेचर LED डेटाईम रनिंग लॅम्प देखील देण्यात आला आहे. यासोबतच साईड प्रोफाइलमध्ये २१-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

फीचर्स आणि कारचा इंटर्नल लूक बघायला गेलं तर, X5 फेसलिफ्टच्या इंटर्नल भागात एक नवीन ट्विन-स्क्रीन पॅनेल दिले आहे. त्यामध्ये BMW च्या iDrive 8 ऑपरेटिंग सिस्टमनुसार चालणारी १४-९ इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि १२.३ -इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर समाविष्ट आहे. तसेच हरमन कार्डन म्युझिक सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले एम स्पोर्ट ट्रिम्सवर आहे.

BMW ने x5 कारमध्ये ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम समाविष्ट केल आहे, ज्यामध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरासह पार्किंग असिस्ट, रिव्हर्स असिस्ट, स्मार्टफोनद्वारे रिमोट पार्किंग तसेच ड्राईव्ह रेकॉर्डिंग यांसारख्या फीचर्स चा समावेश आहे. याबरोबरच x5 कार मध्ये ६ एअरबॅग्ज, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि इतर फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

X5 फेसलिफ्ट पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन पर्यायांसह 48V लाईट-हायब्रिड ने सुसज्ज आहे. xDrive 40i व्हेरियंटला 3.0-लिटर, स्ट्रेट-सिक्स पेट्रोल इंजिन मिळते जे 381hp पॉवर आणि 520 Nm टॉर्क जनरेट करते, पेट्रोल इंजिन फक्त ५.४ सेकंदात ०.१०० किमी प्रतितास वेग करू शकते. xDrive 30d व्हेरियंटला ३.०-लिटर, स्ट्रेट-सिक्स डिझेल इंजिन मिळते जे 2865hp पॉवर जनरेट करते आणि 286hp पॉवर निर्माण करते. दोन्ही इंजिन 12 hp आणि 200 Nm आउटपुट करणार्‍या इलेक्ट्रिक मोटरसाठी 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत.

या कारची किंमत बघायला गेलं तर, BMW X5 फेसलिफ्टची xDrive 40i xLine साठी एक्स-शोरूम किंमत ९३.९० लाख रुपये, तर xDrive 30d xLine व्हेरिएंटसाठी ९५.९० लाख आणि xDrive 40i M स्पोर्ट साठी १.०५ कोटी तसेच xDrive M स्पोर्ट 30d साठी रुपये १.०७ कोटी रूपये इतकी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा