कोरोना ते कंगना… मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार; काय बोलणार याकडे महाराष्ट्रचं लक्ष 

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दि. १३/०९/२०२० रोजी दुपारी १:०० वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. cmomaharashtra च्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, युट्युब आणि इंस्टाग्राम पेजवरुन उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडतातय. एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर देशात सर्वात जास्त आहे, तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रनौत आणि भाजपच्या सततच्या हल्ल्यांमुळे ठाकरे सरकारवर दबाव वाढत आहे. त्याचप्रमाणे राज्यात वाढते कोरोना रुग्ण, मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, शिवसेना विरुद्ध कंगना वाद अशा अनेक मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे  सर्वांचंच लक्ष लागलंय.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या, सुशांत सिंह राजपूत प्रकरण, पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचा केलेला एकेरी उल्लेख, कंगनाच्या कार्यालयाची बीएमसीने केलेली तोडफोड, माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेली मारहाण, भाजपचे विविध आरोप अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा