उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले पुणे हँडमेड पेपर्सच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

पुणे, २३ सप्टेंबर २०२० : महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या पुणे हँडमेड पेपर्सच्या संकेतस्थळाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही संस्था गेल्या 80 वर्षांपासून पर्यावरणपूरक हस्तनिर्मित कागद तयार करत आहे. संस्थेने आतापर्यंत विविध प्रकारची समकालीन कलात्मक कागदाची उत्पादने विकसित केली आहेत. हस्तनिर्मित कागद आणि त्याच्या इतर उत्पादनांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या संकेतस्थळांचे उद्घाटन करण्यात आलं आहे.

कलात्मक कागदपत्रे, रोजनिशी , दिनदर्शिका, फाइल्स, नोटपॅडस्, मुद्रित नोटबुक, रेखाचित्र आणि रेखाटनासाठी असलेली पुस्तके इत्यादी उत्पादने या संकेतस्थळावर ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हस्तनिर्मित आणि पर्यावरणपूरक कागद आणि इतर आवश्यक वस्तूंचा वापर लवकरच सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सुरू केला जाईल असं देसाई यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितलं.

या हस्तनिर्मित कागदाच्या उत्पादनांना मागणी जास्त असून संकेतस्थळावरून ऑनलाइन खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिल्यानं या उद्योगात वाढ होवून उत्पादने विकत घेण्यास खरेदीदारांमधील उत्साहदेखील वाढेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा