लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन, कोरोनामुळं रुग्णालयात होत्या दाखल

मुंबई, 6 फेब्रुवारी 2022: हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीत जगताला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे, जी सांगताना दुःख होत आहे. सर्वांच्या लाडक्या आणि भारतातील स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालंय. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोक पसरला आहे.

लता मंगेशकर यांना कोरोना झाला होता
लता मंगेशकर जवळपास महिनाभर आजारी होत्या. 8 जानेवारीला लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच क्रॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लतादीदींना कोरोनासोबत न्यूमोनियाही झाला होता. लता दीदींचे वय पाहता डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं. तेव्हापासून त्या सतत संघर्ष करत होत्या. उपचारादरम्यान त्यांना अवघ्या 2 दिवसांसाठी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागताच लतादीदींना व्हेंटिलेटरवर आणण्यात आलं.

लता दीदींच्या निधनाची बातमी ऐकून बसला धक्का

सोशल मीडियावर लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहते आणि सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. गायकांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. चाहत्यांचे डोळे ओले पाणावले आहेत. आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आहेत. लता मंगेशकर यांचा मधुर आवाज त्यांच्या चाहत्यांच्या कानात गुंजतोय. आता हा आवाज कायमचा शांत झाला आहे.

वयाच्या 5व्या वर्षी सुरू झालेला प्रवास.. सात दशके चालला

लता मंगेशकर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. जे कधीच विसरता येणार नाही. 78 वर्षांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी 25 हजार गाणी गायली. लतादीदींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्या तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती होती. याशिवाय त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्नही सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी काम करायला सुरुवात केली. ज्या वयात मुलं खेळणं शिकतात त्या वयात लता मंगेशकर यांनी घराची जबाबदारी घेतली. आपल्या भावंडांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी लग्न केलं नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा