पृथ्वी आणि अंतराळातील सीमेचा शोध घेण्यासाठी नासाचा आयकाॅन उपग्रह लाँच

न्यूयाॅर्क : नासाने गुरुवारी आयनमंडळाबाबत (पृथ्वीपासून सुमारे ४८ किमीनंतरचे वायुमंडळ) जास्त माहिती मिळवण्यासाठी एक उपग्रह प्रक्षेपित केला. त्याचे नाव आयकाॅन असे आहे. जेथे पृथ्वीचे वातावरण संपते आणि अंतराळाची सुरुवात होते ती ही रहस्यमय जागा आहे. प्रक्षेपणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच फ्लोरिडा किनाऱ्याजवळ अटलांटिकच्या वर एका विमानाद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. प्रक्षेपणाच्या पाच सेकंदांनंतर त्याच्याशी जोडलेले पेगासस राॅकेट प्रज्वलित झाले. त्यानंतर ‘आयकाॅन’ पुढे गेला.

नासाने सांगितले की, जेथे पृथ्वीचे वातावरण अंतराळाशी जोडले जाते त्या जागेचा डेटा हा उपग्रह मिळवेल. तसेच सौर वादळांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो; अंतराळवीर, रेडिओ संचार आणि जीपीएस नेव्हिगेशन सिस्टीमला कसा प्रभावित करतो याचे विश्लेषण करणे सोपे होईल. आयनमंडळ हा इलेक्ट्राॅन, आवेशित परमाणू आणि अणूंचा उतार-चढावांचा स्तर आहे. हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४८ किमी आणि अंतराळाच्या सीमेपासून ९६५ किमी अंतरावरील भाग आहे. नासाच्या मते, आयकाॅन उपग्रहाद्वारे मिळणारा डेटा वैज्ञानिकांना रहस्यमय आयनमंडळाबाबत आणखी जास्त माहिती मिळवून देण्यास मदत करेल. नासाच्या हेलिओफिजिक्स विभागाच्या संचालक निकोला फाॅक्स यांच्या मते, ‘हा संरक्षित स्तर आपल्या वातावरणातील सर्वात वरचा भाग आहे. त्यानंतर अंतराळाची सुरुवात होते. सौर वादळांसह आयनमंडळ पृथ्वीवर होणाऱ्या चक्रीवादळांतून निघणाऱ्या ऊर्जेमुळेही प्रभावित होते.’

उपग्रह चक्रीवादळ, सागरी वादळांची पूर्वसूचना देईल : नासा नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाइन यांनी ट्विट करून म्हटले की, या मोहिमेमुळे भविष्यात अंतराळवीरांना मोठी मदत होईल. नासाच्या हिलिओफिजिक्स विभागाच्या संचालक निकोला फाॅक्स म्हणाल्या की, हा संरक्षित स्तर आपल्या वातावरणाचा वरील भाग आहे. या भागात सूर्यामुळे अनेक घटना घडत आहेत. चक्रीवादळ, सागरी वादळ आणि पृथ्वीवर घडत असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या घटना त्यात वाढच करत आहेत. हा उपग्रह त्याची पूर्वसूचना देण्यासाठी सहाय्यभूत ठरेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा