रिलायन्स jio ने लॉन्च केला ‘Jio Bharat V2’ मोबाईल

मुंबई, ४ जुलै २०२३ : रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ने आपला ४जी फोन ‘Jio Bharat V2’ लॉन्च केला आहे. नवीन ‘Jio Bharat V2’ अतिशय कमी दरात उपलब्ध होणार आहे. माहितीनुसार या फोनची किंमत ९९९ रुपये आहे. या फोनमार्फत जिओ कंपनीचा भारतातील सुमारे २५० दशलक्ष २G ग्राहकांना लक्ष्य करण्याचा हेतू आहे. हे ग्राहक सध्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया सारख्या कंपन्यांशी कनेक्ट आहेत. रिलायन्स जिओ फक्त ४G आणि ५G नेटवर्क सुविधा देते. रिलायन्स जिओ कंपनीने दावा केला आहे की ‘Jio Bharat V2’ च्या आधारे कंपनी १० कोटींहून अधिक नवीन ग्राहक जोडतील. जिओभारत V2 च्या फोन सोबतच महिन्याचा प्लॅन ही सर्वात स्वस्त आहे. अमर्यादित व्हॉइस कॉलसाठीच्या या २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी, ग्राहकांना फक्त १२३ रुपये द्यावे लागणार आहेत, त्यामध्ये १४ जीबी डेटा असणार आहे.

इतर ऑपरेटरचा व्हॉईस कॉल आणि २ जीबीचा मासिक प्लॅन १७९ रुपयांपासून आहे. याआधी २G ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने २०१८ मध्ये जिओ फोन ही आणला होता. आणि हा जिओफोन आजही १३ कोटींहून अधिक ग्राहकांची पसंती ठरला आहे. त्यामुळे जियो कंपनीला ‘Jio Bharat V2’ कडूनही त्याच अपेक्षा आहेत. ‘Jio Bharat V2’ वर एक वार्षिक योजना देखील आहे ज्यासाठी ग्राहकाला १,२३४ रुपये द्यावे लागतील

Jio Bharat V2 फीचर्स पाहिले तर हा मेड इन इंडिया फोन आहे, फक्त ७१ ग्रॅम वजनाचा ‘Jio Bharat V2’ हा 4G वर काम करतो, यात HD कॉलिंग, FM रेडिओ, १२८ GB SD मेमरी कार्ड सपोर्ट आहे. मोबाईलमध्ये ४.५ सें.मी.ची TFT स्क्रीन, ०.३ megapixel कॅमेरा, बॅटरी – १००० mAh, ३.५ mm हेडफोन जॅक, तसेच पावरफुल लाऊडस्पीकर आणि टॉर्च देखील आहे.

या मोबाईल मधील विशेष फीचर्स म्हणजे, Jio Bharat V2 मोबाईल ग्राहकांना JioCinema च्या सबस्क्रिप्शनसह Jio-Saavn मधील ८० दशलक्ष गाण्यांचा आनंद देणार आहे. तसेच V2 वर ग्राहक Jio-Pay द्वारे UPI वर व्यवहार देखील करू शकतील. Bharat V2 मोबाईल २२ भारतीय भाषांमध्ये काम करू शकतो. कंपनीने ७ जुलैपासून ‘Jio Bharat V2’ ची bita चाचणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनीचा ‘Jio Bharat V2’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच कंपनीच लक्ष्य आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा