नाशिकच्या नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

नाशिक, ९ नोव्हेंबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ,खरीप पिके हातची गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पशुधन वाचविण्यासाठी नांदगाव, मालेगाव व देवळा परिसरातील पशुधन मालकांना चाऱ्याची जमवा जमव करावी लागत आहे.

ज्या ठिकाणी पाणी आहे अश्या ठिकाणचा चारा अव्वाच्या सव्वा भावात विकत घेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. सध्या रस्त्यावर पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांची लगबग सुरु असून चाऱ्यांनीं भरलेल्या वाहनांची वर्दळ दिसत आहे. पुढील आठ महिने टंचाई काळात जनावरांसाठी विकतचा चारा घ्यावा लागणार असल्याने शेतकरी हतबल झाला असून, किमान पशुधन वाचविण्यासाठी तरी शासनाने पुढाकार घेऊन तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी आता पशुधन मालकांकडून केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा