टेनिस चा बादशाह राफेल नदालची आगामी फ्रेंच ओपनमधून माघार, दुखापतीमुळे त्रस्त असल्याने निर्णय

स्पेन २० मे २०२३: टेनिस क्ले काेर्टचा बादशाह, फ्रेंच अाेपन स्पर्धेत विक्रमी १४ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावणारा ३६ वर्षीय राफेल नदाल यंदाच्या फ्रेंच अाेपनमध्ये खेळताना दिसणार नाही. सातत्याने सुरू असलेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. ३० मे पासून यंदाच्या सत्रातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम म्हणजेच फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेणार अाहे. क्ले काेर्टवरील या ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान नंबर वन चॅम्पियन राफेल नदालचा सहभाग सातत्याने लक्षवेधी ठरत आलाय. कारण, त्यानेही याच काेर्टवर कित्येक वर्ष अापले निर्विवाद वर्चस्व राखले अाहे. परंतु शारीरिक दुखापतीमुळे या स्पर्धेत न खेळण्याचे त्याने जाहीर केलंय.

यंदाच्या सत्रातील पहिल्याच ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेदरम्यान मला गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून मी सातत्याने याच दुखापतीला सामाेरे जात अाहे,’ असेही त्याने सांगितले. याबाबत मीडियावर एक पोस्ट करताना नदाल म्हणाला की, ‘टेनिस काेर्टवर खेळण्यासाठी माझ मन तयार अाहे. माझ्या मनाला माेठे यश संपादन करण्याचा विश्वास अाहे पण या सर्वांपासून मला माझे शरीर राेखत अाहे. टेनिसच्या काेर्टवर खेळण्यासाठी मला अाता शरीरच परवानगी देत नाही. शारीरिक दुखापतीमुळेच मला काेर्टपासून दूर रहावे लागत अाहे. त्यामुळे फ्रेंच अाेपनमधून माघार घेण्याचा हा मनाचा निर्णय नाही तर हा शरीराचा निर्णय आहे आणि ते साथ देत नसल्याने मला खेळता येत नाही, अशा भावुक शब्दांमध्ये हिप इंज्युरीने त्रस्त असलेल्या नदालने पाेस्ट केली.

टेनिसपटू नदालने अातापर्यंत फ्रेंच अाेपनमध्ये अापला दबदबा कायम ठेवलाय. स्पेन च्या या खेळाडूने फ्रेंच अाेपन स्पर्धेमध्ये १४ वेळा पुरुष एकेरीचा किताब पटकावला अाहे. यामुळेच त्याला या ठिकाणचा किंग मानले जाते. या स्पर्धेने त्याला टेनिसच्या विश्वामध्ये माेठी अाेळख मिळवून दिली. खासकरून नदालचे सामने पाहण्यासाठी चाहत्यांची फ्रेंच अाेपन दरम्यान हजाराेच्या संख्येत उपस्थिती असते. परंतु या निर्णयामुळे नदाल चे चाहते निराश झाले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा