अधिवेशनचा दुसरा दिवस… केवळ टोलवा-टोलवीचा

मुंबई, १८ ऑगस्ट २०२२: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात विरोधकांनी नवीन घोषणाबाजीने केली. गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी अशा घोषणांनी आज विरोधकांनी शिंदे गटाचे स्वागत केले. त्या घोषणाबाजीवर प्रताप सरनाईक यांनी आम्ही गद्दार नाही, तर खुद्दार आहोत, असं स्पष्टीकरण प्रतापरा दिलं.

अधिवेशनाच्या पहिला दिवसापासून आदित्य ठाकरे विरुद्ध आशिष शेलार यांचं शाब्दिक युद्ध सुरु आहे. या युद्धाला आज हवा मिळाल्याचं दिसतंय. यावर आशिष शेलारांनी ट्विट केलं. त्यांनी सांगितलं की माझ्या मतदार संघात काम करण्यासाठी मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. वरळीत खासदार, आमदार आहेत, पण स्टॅम्प घ्यायला पैसे नाहीत असा टोला आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना लगावला. न केलेल्या कामाचे क्रेडिट युवराज घेत आहेत. त्यातही आमच्या मताच्या बळावर ते निवडून आले. आता क्रेडीटही घेत आहेत, हे आयत्या बिळावर नागोबा आहे, असा टोला त्यांनी लगावला.

भास्कर जाधव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नितेश राणे खुर्चीवरुन उठलेच नाही. तेव्हा यांना मॅनर्स शिकवा, असा खोचक टोला जाधवांनी नितेश राणेंना दिला.

पालघरमध्ये झालेल्या एका गरोदर आईच्या समोर तिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. तो प्रश्न अजितदादांनी म्हणजे अर्थात विरोधकांनी उचलून धरला. तर लवकरच यावर आम्ही काम करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं. त्याचबरोबर शेततकऱ्यांचा प्रश्न त्यांनी उचलून धरला. सध्या अतीवृष्टी मुळे शेतकत्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊस भरपूर झाला आहे. त्यामुळे १ सप्टेंबरला ऊस कारखाना सुरु करण्याचे आदेश द्या. जेणेकरुन शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल, अशी मागणी अजितदादांनी केली. तुमच्या उत्तराकडे जनता आतुरतेने पहात आहे. तेव्हा तुम्ही या प्रश्नांवर प्रकाश टाका. हे सरकार निष्क्रिय सरकार नाही, हे जनतेला दाखवून देण्याचं आवाहन अजितदादांनी केलं.
एकुणात आजचा दिवसही विरोधकांनी प्रश्न निर्माण करण्यात आणि टोलवा-टोलवी करण्यात घालवला, हे मात्र खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा