केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांविरोधात जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे शेतकरी आणि सर्व पक्षीय रास्ता रोको आंदोलन

चोपडा, जळगाव २७ डिसेंबर २०२३ : सध्या केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी लावण्यात आली आहे तसेच कापसाला आणि ऊसाला भाव नाही आणि हा सगळा केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांचा परिणाम आहे, असे मत मांडत सरकारने चुका सुधाराव्यात या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे शेतकरी संघटनेसह सर्व पक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हा पुर्णतः मेटाकुटीला आलेला आहे. मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये राज्य व केंद्र सरकार विषयी तिव्र नाराजी पसरली आहे. सरकारचे याकडे लक्ष वेधले जावे. म्हणून चोपडा येथे धरणगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बुधगाव येथील ऊर्वेश साळुंखे या तरूणाने डोक्यावर कापसाची टोपी आणि गळ्यात कांद्याची माळ घातल्यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
या रास्ता रोको आंदोलन दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चोख बंदोबस्त ठेवला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा