गुटखा माफियांची ग्रामीण भागात महागड्या कारमधून द्वारपोच सेवा

जालना, ११ एप्रिल २०२४ : गुटखा माफियांनी आता ग्रामीण भागातील दुकानदार आणि पान टपरीचालकांना द्वारपोच गुटखा पोहोचविण्यासाठी महागड्या कारचा वापर सुरू करून नवीन शक्कल लढविली आहे. महागड्या कारमधून गुटख्याची वाहतूक केल्यास पोलिसांना संशय येणार नाही असा गुटखा माफियाचा समज झालेला आहे. मात्र महागड्या कारमधून गुटखा द्वारपोच देणाऱ्या रामनगर येथील गुटखा माफियांचा डाव आज मौजपुरी पोलिसांनी हाणून पाडला आहे.

रामनगर येथील गुटखा माफिया अनिल शिवाजी जाधव हा त्याच्या टाटा पंच कारमधून राजनिवास, गोवा-१००० आणि विविध पान मसाल्याचा साठा घेऊन आज बाजी उमरदकडे निघाला होता. याबाबत माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. मिथुन घुगे यांनी सापळा रचून बाजी उमरद गावाजवळ एका पुलावर अनिल जाधव यास गुटख्याच्या कारसह ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी ५ लाखाची कार आणि २१ हजाराचा गुटखा असा एकूण ५ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा