कोरोना JN-1 व्हेरीएंटच्या अनुषंगाने जालना आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर

जालना २६ डिसेंबर २०२३ : कोरोना JN-1 व्हेरीएंटच्या अनुषंगाने जालना आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले असून आज पासून आरटीपीसीआर आणि अँटीजिन टेस्टिंगला जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप नवीन वेरिएंटचे रुग्ण आढळलेले नाहीत. जिल्हा रुग्णालयात आयसीयूचे चाळीस बेड सध्या उपलब्ध असून, अजून १४० बेड्स तयार करून ठेवण्यात आले आहेत. योग्य तो औषध साठा देखील उपलब्ध असुन याबाबतीत सर्व उपाययोजना जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील यांनी दिली.

सध्या जालना शहरासह जिल्ह्यात बदलत्या वातावरणाने साथीचे रुग्ण देखील वाढले असून नागरिकांमध्ये सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी यासारखे आजार बळावले आहेत. त्यामुळे खाजगी रूग्णालयांसह सरकारी रूग्णालय पेशंटच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाहेर रुग्णांनी तपासणीसाठी लांबच लांब रांगा लावलेल्या असून कारोनाच्या विषाणूची लागण तर झाली नाही ना या भीतीने नागरिकांनी रुग्णालयात एकच गर्दी केल्याने आरोग्ययंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा