रेकॉर्ड-ब्रेकर सिंधू

पुणे, १८ जुलै २०२२: भारताच्या पी.व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इतिहास रचून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. यात तिने चीनच्या वॅंग झी हिचा तीन गेम्समध्ये २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला. या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. त्यामुळे भारत आता बॉडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

सिंधूने या सामन्यात अतिशय दणक्यात सुरुवात केली होती. पहिला गेम तिने सहज जिंकला. दुसरा गेम ती सहज जिंकून सामना जिंकेल असं वाटतं होतं. पण त्याऐवजी दुसरा गेम वॅंग झी हिने सहज जिंकून सिंधूला एकदा दडपणाखाली आणले. तिसरा सामना हा निर्णायक होता. ज्यात जेतेपदावरची मोहोर पक्की होणार होती. तिसरा सामना हा अतिशय निर्णायक पद्धतीने सिंधूने खेळल्यामुळे वँगझीला हा मोठा धक्का बसला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूची बॉडी लँग्वेज ही अतिशय पॉवरफुल होती, जिचा परतावा करणे वँग झीला शक्य झाले नाही आणि अखेर सिंधूने तिसरा सामना जिंकला. तिस-या गेममध्ये सिंधूने आपले वर्चस्व राखत तिने स्वत:ला सिद्ध केले आणि तिस-या गेमममध्ये वँगझीचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

सिंधूच्या नावावरचे रेकॉर्डस

२०२२ – सिंगापूर आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटनस्पर्धेत विजेतेपद
२०१९- सुवर्णपदक, वर्ल्ड चँम्पियनशीप महिला ऐकरी स्पर्धा
२०१८, १०१७- रौप्यपदक, वर्ल्ड चँम्पियनशीप महिला ऐकरी स्पर्धा
२०१३, २०१४- कांस्यपदक, वर्ल्ड चँम्पियनशीप महिला ऐकरी स्पर्धा
२०१३- रौप्यपदक, जकार्ता , महिला एकेरी स्पर्धा
……………………………………………….
२०१८- मिश्र दुहेरीत सुवर्णपदक, कॉमनवेल्थ गेम
२०१८- रौप्यपदक, महिला एकेरी कॉमनवेल्थ गेम
………………………………………………..
२०१६- सुवर्णपदक, महिला टीम, गुवाहाटी
२०१६-रौप्यपदक, महिला ऐकेरी, गुवाहाटी
…………………………………………………
याखेरीज अनेक रेकॉर्डस् पी.व्ही. सिंधूच्या नावावर आहेत. सध्या सिंधू फॉर्ममध्ये आहे. तिच्याकडून भारताला भरपूर अपेक्षा आहे. त्यामुळे सिंधूकडून आता अजून किती रेकॉर्डस केले जातील आणि किती रेकॉर्डस मोडले जातील, हे पहावं लागेल.

न्यू अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा