झोपण्यापूर्वी ही काळजी घ्या..

पुणे, १० ऑक्टोबर, २०२२ : दिवसभराच्या धकाधकीनंतर कधी एकदा गादीवर पडून झोपतो, असं होतं. पण झोपताना शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…

१. रात्री झोपताना सुटसुटीत कपडे घाला. त्यातही सुती आणि मोकळ्या कपड्यांना प्राधान्य द्या.

२. जर तुम्ही उशीरा जेवण करत असाल तर त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पोटात जळजळ किंवा आग पडू शकते. पोट फुगण्याची समस्या जाणवू शकते. यासाठी शक्यतो झोपण्याच्या आधी चार तास जेवणाची सवय शरीराला लावा.

३. रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफीसारखी पेये घेणे शक्यतो टाळावीत. त्यामुळे झोप जाण्याची शक्यता असते.

४. जर तुम्ही मेकअप करत असाल, तर झोपण्यापूर्वी क्लिंझिंग मिल्क ने मेकअप काढा आणि झोपताना खोबरेल तेल लावा किंवा मॉइश्चरायझर लावून मग झोपा. त्यामुळे त्वचेचे नुकसान होणार नाही.

५. झोपताना अंत:वस्त्रे काढून झोपा. त्यामुळे शरीरातील सर्व स्नायू मोकळे होतील.

६. झोपण्याच्या आधी साधारण दोन ग्लास गरम पाणी प्या. त्यामुळे पोटाला आतून शांतता मिळेल.

७. झोपण्यापूर्वी मेडिटेशन किंवा प्राणायाम करा. त्यामुळे मनातले सर्व नकारात्मक विचार निघून जातील आणि शांत झोप लागेल.

८. काही जण मेडिटेशन किंवा प्राणायाम करत नाही. अशा लोकांनी आपली आवडती गाणी ऐकावी.

९. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा सोशल मिडीयाचा वापर टाळा. त्यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होतो. पण चांगली झोप लागण्यासाठी पुस्तक वाचणे सोयीस्कर असते. प्रकाश, किरणे जी डोळ्यांसाठी हानीकारक असतात, तो प्रश्नच उद्भवत नाही.

१०. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे झोपण्याची जागा शांत असावी. तसेच त्या खोलीचा रंग मनाला प्रसन्न करणारा असावा.

या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला व्यवस्थित झोप लागेल. रात्रीच्या झोपेवर दुस-या दिवसाचे गणित अवलंबून असते. तेव्हा रात्री मस्त झोप घ्या…. आणि स्वस्थ रहा….

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा