टेनिस: कोलोन मध्येही अँडी मरे पहिल्या फेरीत बाहेर

कोलोन (जर्मनी ), १४ ऑक्टोबर २०२०: स्टार अँडी मरे याचे खराब प्रदर्शनाचे सत्र कोलोन मध्येही सुरू आहे. त्याला पहिल्याच फेरीत फर्नांडो वर्डास्कोकडून परजयाचा सामना करावा लागला आहे. वर्डास्कोने मरेच्या खराब सर्विसचा फायदा घेत त्याला ६-४ ,६-४ ने पराभूत केले. हा सामना जर्मनीच्या वेळेनुसार मध्यरात्री सुरू होता. वर्डास्कोने ४ वेळा मरेची सर्विस तोडली.

याआधी मरे यू.एस. ओपनच्या दुसऱ्या फेरीत बाहेर झाला होता. तसेच फ्रेंच ओपनच्या पहील्याच फेरीत त्याला पराजयचा सामना करावा लागला होता. त्याने या दोन्ही स्पर्धेत वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन प्रवेश केला होता. कोलोनमध्ये तो पहिल्या फेरीत विजय मिळविण्यात अपयशी ठरला. हा त्याचा इंडोर हार्ड कोर्ट मधील २०१५ पासून पहिलाच पराजय आहे.

तसेच वर्डास्को पुढील सामन्यात अलेजन्द्रा जेवरेव याच्यासोबत भिडणार आहे. जर्मनीच्या या खेळाडूला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. तसेच क्रोयाशियाच्या मारीन सिलीच याने पहिल्या सामन्यात मार्कोस गिरोन याला ७-२, ४-६, ६-३ ने पराजित केले. पुढच्या सामन्यात त्याला स्पेनच्या अलेजांद्रा देविडोविच फोकिना याच्यासोबत खेळायचे आहे. ज्याने फिनलेंडच्या एमिल रूसुवोरी याला ७-५, ६-४ ने पराभूत केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा