पवित्र गोदावरी नदी बनली गटारगंगा, नदीतील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

नांदेड, २ जून २०२३ : नाशिक मधून उगम पावणाऱ्या,आणि दक्षिण भारताची गंगा अशी ओळख असणारी,गंगा नदी नांदेडमध्ये नाभी स्थानी आहे. मात्र या पवित्र गोदावरी नदीला गटारगंगा करण्याचे काम प्रशासनाने केल्याचा आरोप होत आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पात्रात गटारीचे पाणी मिसळत असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात असलेल्या जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

गोदावरी नदीत बऱ्याचदा मृत मासे नदीच्या किनारी आल्याचे पाहायला मिळाले होते. तर या नदीत असणारे पाण कोंबड्यांची संख्या प्रदुषणामुळे कमी झाली असून ते नाहीसेच झाले आहे. तर पवित्र अशा या गोदावरीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नदीच्या पाण्यातून प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने नदीजवळ येणे सर्वसामान्य नागरिकांना अशक्य झाले आहे.शहरातील एकूण २८ नाल्याचे दूषित पाणी गोदावरीत मिसळत असून प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

मोठमोठ्या शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांमधून होणारे प्रदूषण, हे नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम करणारे आहे. यामध्ये नद्यांमधील जलपर्णी ही समस्या असो अथवा शहरांमधील एमआयडीसी मधून सोडण्यात येणारे केमिकल युक्त पाणी सुद्धा या नद्यांमध्ये मिसळले जाते. त्यातून होणारी रोगराई आणि नागरिकांच्या जीवनावर होणारा परिणाम, याकडे खरंच शासन लक्ष देणार आहे का ?असे म्हणण्याची वेळ यामुळे आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा