कोणत्या राज्यात कुठल्या पक्षाचा उडतोय गुलाल आणि कोण होणार बेहाल, वाचा एक्झिट पोल

नवी दिल्ली, ३० एप्रिल २०२१: नुकतेच पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम या ५ राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या. अर्थात २ मे ला सर्व चित्र स्पष्ट होईलच. पण, मतदान पार पडल्या नंतर एक्झिट पोल आता समोर आला आहे. ज्यामधे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पक्षांना बहुमत आसल्याचं समजते आहे. तर कोणत्या राज्यात कुठल्या पक्षाचा उडतोय गुलाल आणि कोण होणार बेहाल ते आता लवकरच कळेल. तत्पूर्वी टिव्ही 9- पोलस्ट्राटचा एक्झिट पोलचे आकडे समोर आली आहेत.

पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा….

एकूण जागा २९२

तृणमूल (TMC) : १४२ ते १५२

भाजप (BJP) : १२५ ते १३५

डावे + काँग्रेस (LEFT + CONGRESS ) : १६ ते २६

केरळमध्ये कुणाला किती जागा…..

एकूण जागा १४०

LDF : ७० ते ८० जागा

UDF : ५९ ते ६९ जागा

NDA : ० ते २ जागा

तमिळनाडूत कुणाला किती जागा…..

तमिळनाडू मधे यंदा सत्ता परिवर्तनाचा अदांज आहे. सत्ताधारी AIDMK ला विरोधी DMK ने मोठा झटका दिल्याचं मानलं जात आहे.

एकूण जागा २३४

DMK : १४३ ते १५३ जागा

AIDMK : ७५ ते ८५ जागा

अन्य : ० ते १२ जागा

आसामधे कुणाला किती जागा….

टिव्ही 9-पोलस्ट्राटचा एक्झिट पोलनुसार आसामधे काँग्रेस आणि भाजप मधे चुरशीची लढत झाल्याचे दिसून आले आहे. सत्तेत पुनरागमन करण्यासाठी भाजप ने जोर लावला आहे तर भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं ही सर्वस्व पणाला लावलं आहे.

एकूण जागा १२६

NDA : ५९ ते ६९ जागा

UPA : ५५ ते ६५ जागा

अन्य : १ ते ३ जागा

पद्दुचेरी मधे कुणाला किती जागा…..

एकूण जागा ३०

भाजपप्रणित NDA : १७ ते १९ जागा

काँग्रेसप्रणित UPA : ११ ते १३ जागा

सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे .तरी देशातील या राज्यात निवडणूका पार पडल्या आहेत. तर येत्या २ तारखेला कोणी बाजी मारली हे कळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा