अ‍ॅसिडिटी होत असेल तर..

अन्न हे पूर्णब्रह्म! हे आपण अनेकदा ऐकतो. खाद्यसंस्कृतीचा इतिहास मोठा आहे. परंतु प्रकृतीही महत्त्वाची आहे. यावेळी आणि अति जेवण अ‍ॅसिडिटीला आमंत्रण देते. वेळच्यावेळी आणि तेलकट पदार्थ टाळून देखील ऍसिडिटी होत असेल तर….
 
खालील टिप्स फक्त अ‍ॅसिडिटीने त्रासलेल्यांसाठी
 
आहाराच्या वेळा : सातत्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास आहारांच्या वेळा योग्य आहेत. दुपारच्या जेवणाची वेळ पाळणे आवश्यक आहे. ती जेवणाची वेळ चुकता कामा नये. सकाळची न्याहारी सर्वसाधारणपणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घ्यावी. न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे. हे शक्य नसेल तर न्याहारीमध्ये पोळी-भाजी खावी. दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मधल्या वेळात हलक्या पदार्थाचे सेवन करावे.
 
पथ्ये :शिळे पदार्थ, आंबट दही, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. भाज्यांमध्ये मेथी, मेथीचे पदार्थ, मुळा आणि मुळ्याचे पदार्थ, सिमला मिरची यांचे प्रमाण कमी असावे. हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली मिरची हे पदार्थ आहारातून टाळावेत.
 
घरगुती उपाय :रोज एक चमचा मोरावळा खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. आवळा पावडर आणि ज्येष्ठमध समभाग एकत्र करून अर्धा चमचा रोज सकाळ-संध्याकाळ दोन वेळा घ्यावी. 
 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा